सध्या भाजपामध्ये इनकमिंग जोरात सुरू असून, काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी देखील शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन देखील उपस्थित होते. दरम्यान सत्तार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आता सत्तार भाजपामध्ये जातात का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या तिकीट वाटपावरुन काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली होती. काँग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंड पुकारले आहे.

औरंगाबाद लोकसभेसाठी काँग्रेसने विधानपरिषदेचे आमदार सुभाष झांबड यांना दिलेली उमेदवारी मान्य नसल्याचे सांगत स्वतः लोकसभेच्या निवडणुकीत अपक्ष उभे राहणार असल्याचे सत्तार यांनी सांगितले. दरम्यान सत्तार यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचाही राजीनामा दिला आहे. याबाबत सत्तार म्हणाले की, यापूर्वीच मी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे माझा राजीनामा दिला आहे. तीस वर्ष पक्षाची सेवा केल्यानंतर पक्ष लोकसभेचे तिकीट देईल, असे वाटत होते. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे मी अपक्ष लढण्याचा निर्णय घेत असल्याचे सत्तार यांनी सांगितले.

काँग्रेसने महाराष्ट्रातील उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली, यात औरंगाबादसाठी आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी देण्यात आली होती. यावर सत्तार यांनी नाराजी व्यक्त केली. “मी अनेक महिन्यांपासून लोकसभेची तयारी करत होतो. एल्गार यात्रा आणि कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन पक्षवाढीसाठी मी वणवण फिरलो. तरिही पक्षाने मला तिकीट दिले नाही.”, अशी खंत अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली.

विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापुर्वी भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातून जनआशिर्वाद यात्रा काढली होती. तेव्हा काॅंग्रेसमधून बाहेर पडलेले अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे नव्या पक्षाच्या शोधात होते. भाजपमध्ये जाण्याची त्यांची पुर्ण तयारी देखील झाली होती. अगदी फडणवीस यांच्या जनआशिर्वाद यात्रेच्या वाहनात चढून सत्तार यांनी फडणवीस यांचे जोरदार स्वागत करून जणू आपला भाजपमध्ये प्रवेशच झाला असे चित्र निर्माण केले होते.

तर दुसरीकडे ज्या सत्तारांच्या विरोधात आयुष्यभर लढलो आता त्याच सत्तारांना खांद्यावर घेऊन नाचायचे हे काही मतदारसंघातील पदाधिकारी व भाजप कार्यकर्त्यांना पचनी पडले नाही. (Shivsena) त्यांनी आधी खासदार रावसाहेब दानवे यांच्याकडे आपला विरोध प्रगट केला, पण सत्तार-दानवे यांची सेटिंग माहित असल्यामुळे इथे न्याय मिळणार नाही हे त्यांना पक्के ठाऊक होते. म्हणून तेव्हा दानवेंना बायपास करून तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी मुंबईत जाऊन फडणवीसांना भेटले होते.

सत्तारांना होणारा टोकाचा विरोध पाहून तेव्हा फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच सत्तारांना शिवसेनेत प्रवेश मिळाल्याच्या चर्चा होत्या. आता तेव्हा नेमकं काय घडलं होतं, सत्तार भाजपमध्ये जाताजाता शिवसेनेत कसे आले याचा किस्साच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी `सरकारनामा`शी बोलतांना सांगितला.

सत्तार यांच्या भाजप प्रवेशाची सगळी तयारी झाली होती, अगदी पहाटे सत्तारांनी फडणवीसांच्या बंगल्यावर जाऊन घेतलेली भेट देखील तेव्हा चांगलीच चर्चेत होती. सत्तार भाजपमध्ये जाणार हे जवळपास निश्चित असतांना इकडे शिवसेनेने सत्तार यांचे कट्टर विरोधक असलेले प्रभाकर पालोदकर यांना शिवसेनेत प्रवेश देण्याची तयारी सुरू केली होती.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले, प्रभाकर पालोदकर हे आधी सत्तार समर्थक म्हणून ओळखले जायचे. पण त्यांच्यात फाटले आणि पालोदकर यांनीच सत्तार यांच्याविरोधात विधानसभा निवडणुकीत दंड थोपटण्याची घोषणा केली. तेव्हा मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी पालोदकरांना शिवसेनेत प्रवेश देण्याबाबत बोललो होतो. उद्धव साहेबांनी देखील त्यांना मातोश्रीवर घेऊन या असे मला सांगतिले.

मी तीन-चार दिवसांत पालोदकर यांना मातोश्रीवर घेऊन जाणारच होतो. पण त्याच दरम्यान, सत्तार याने कसा आणि कुठून लग्गा लावला कळालेच नाही. उद्धव साहेबांचा मला फोन आला आणि अब्दुल सत्तार यांना आपण शिवसेनेत प्रवेश देत असल्याचे त्यांनी मला सांगितले. पालोदकरांना शिवसेनेत प्रवेश द्यायचे निश्चित झालेले असतांना अचानक हा निर्णय बदलल्याने मलाही धक्का बसला. भाजपने सत्तारची डोकेदुखी नको म्हणून तेव्हा त्याला आमच्याकडे पाठवून दिले, असेही खैरे यांनी सांगितले.

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started