भारतीय कामगार सेनेचा कंत्राटी कामगार परिषद

भारतीय कामगार सेनेची कंत्राटी कामगार परिषद आज २७/०२/२०१६ रोजी बालगंधर्व येथे भरगच्च सभागृहात उत्साहात पार पडली.या कार्यक्रमास शिवसेना उपनेते व भा.का.सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री.सुर्यकांतजी महाडिक, शिवसनेचे उपनेत्या व प्रवक्त्या आदरणीय मा.आ.नीलमताई गोऱ्हे, शिवसनेचे पुणे शहरप्रमुख मा.श्री.विनायक निम्हण व अन्य मान्यवर उपस्थित होते. भारतीय कामगार सेनेने तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांतिकारी पाउला टाकत कामगारांच्या तक्रारी ऑनलाईन नोंदवीण्यासाठी भा.का.से आय.टी युनिट व युनिव्हर्सल कन्सल्टंट या आमच्या कंपनीच्या संयुक्त विद्यमाने भारतीय कामगार सेनेचे संकेतस्थळाचे (वेबसाईट) अध्यक्ष मा.आ.श्री.सुर्यकांतजी महाडीक साहेब व शिवसेनेच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या मा.आ.नीलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या कामी भा,का.से. चे सरचिटणीस मा.डॉ.रघुनाथजी कुचिक यांचे मार्गदर्शन व माझे सहकारी मा.भावनाताई थोरात व श्री.मयुरेश कुलकर्णी याची मोलाची साथ लाभली. या कार्यक्रमाचे आयोजक भा.का.सेना.-अॅक्सीस बँक युनिट यांचे आभार.

आपला विनित
दीपक शेडे
मुख्य निमंत्रक व महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य

 

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started